31 मार्चपासून नवीन दर लागू : लाखो ग्राहकांवर होणार परिणाम
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) लॉकर ग्राहकांना 31 मार्च 2020 पासून लॉकरमध्ये सामान ठेवणे महाग होणार आहे. एसबीआयने लॉकर शूल्क वाढविला असून, नवीन दर 31 मार्चपासून लागू होणार आहेत. लॉकरच्या आकारानुसार एसबीआयने भाडे शुल्क 500 रुपयांनी वाढवून 2000 रुपये केले आहे. खातेधारकाचे लॉकर कोणत्या शहरात आहे यावर हे शुल्क अवलंबून असणार आहेत.
लहान लॉकरचे भाडे 500 रुपयांवरून 2,000 रुपयांपर्यंत वाढू शकतात, तर जास्त मोठय़ा लॉकरचे भाडे आता 9,000 रुपयांऐवजी 12,000 रुपये द्यावे लागणार आहे. मध्यम आकाराच्या लॉकरसाठी 1,000 रुपयांवरून 4,000 रुपयांपेक्षा अधिक शुल्क आकारले जाईल. मोठय़ा लॉकरचे भाडे 2 हजार ते 8 हजार रुपयांपर्यंत असेल.
सेफ डिपॉझिट लॉकर ही बँकांची एक खास सुविधा आहे. हे लॉकर वेगवेगळय़ा आकारात येतात. मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी लॉकरचा वापर केला जातो. फक्त लॉकरधारक किंवा संयुक्त धारकच त्यांचा वापर करू शकतो. रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेनुसार, कोणत्याही बँकेत खाते नसताना लॉकर उघडा येते.
या केवायसी कागदपत्रांची आवश्यकता…
लॉकर उघडण्यासाठी केवायसीची कागदपत्रे यामध्ये आधारकार्ड, पॅनकार्ड आणि छायाचित्रांसह सादर करावी लागतात. लॉकरचे भाडे तीन वर्षांसाठी भरण्यासाठी बँक निश्चित ठेव विचारू शकते. सामान्यत: अर्जदाराला खात्यातून शुल्क कपात करण्यासाठी बँकेकडून सूचना देण्यात येते.









