वकिलांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावमध्ये स्टेट कंझ्युमर फोरम 2020 मध्ये मंजूर झाले. मात्र या कंझ्युमर फोरमसाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. सुवर्णसौधमध्ये कंझ्युमर फोरमसाठी जागा उपलब्ध करावी, अशी मागणी बेळगाव बार असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
बेळगावात राज्य कंझ्युमर फोरम स्थापन होणार असल्याने ग्राहकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. कारण यापूर्वी जिल्हा कंझ्युमर फोरममध्ये निकाल लागल्यानंतर सोसायटय़ा तसेच इतर संस्था राज्य कंझ्युमर फोरमकडे अपील करत होत्या. त्यामुळे ग्राहकांना बेंगळूरला जावे लागत होते. पण आता राज्य कंझ्युमर फोरमच बेळगावात स्थापन झाल्यामुळे वकिलांबरोबरच पक्षकारांनाही (ग्राहकालाही) दिलासा मिळाला आहे. तेव्हा या फोरमसाठी जागा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड. गजानन पाटील, जनरल सेपेटरी आर. सी. पाटील, जॉईंट सेक्रेटरी शिवपुत्र फटकळ आदी उपस्थित होते.









