भारती सिंग एक उत्तम कॉमेडियन तर आहेच पण ती अनेक शोमध्ये अँकर देखील आहे. तिचे अँकरिंग आणि तिने मारलेले पंच प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस पडतात. मात्र, भारती सिंग गरोदर असून ती कलर्स वाहिनीवरील शो ‘हुनरबाज- देश की शान’चे अँकरींग करणार आहे. यात तिच्यासोबत हर्ष लिंबाचिया देखील दिसणार आहे. भारतीने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती देशाची पहिली प्रेग्नंट अँकर असल्याचे सांगत आहे आणि त्याचवेळी दोघांच्या पैशात तिघांकडून काम करुन घेत असल्याचा तिने मजेशीर दावा केला आहे. भारतीने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, महिलांना गर्भवती झाल्यानंतर घरात राहण्याची सक्ती केली जाते, मात्र ती जुनी विचारसरणी बदलू इच्छिते. एक स्त्राr प्रेग्नंसीमध्ये तिचे कामे करु शकते. त्यामुळे ही भारतातील सर्व काळजी करणाऱया महिलांची विचारधारा बदलण्याचा निर्णय भारतीने घेतला आहे. भारतीचा हा व्हिडिओ शेअर करत कलर्सने लिहिले आहे की, ‘देशातील पहिली गर्भवती अँकर ‘हुनरबाज’च्या मंचावर येत आहे.
आपल्या मेहनतीने भारती संपूर्ण देशाची विचारसरणी बदलत आहे असं म्हणत तिला सलाम केला आहे.









