वृत्तसंस्था/ लंडन
ऍस्टन व्हिलाचे मॅनेजर स्टीव्हन गेरार्ड यांना प्रिमियर लीगमधील पुढील सामने हुकणार असून त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे त्यांच्या क्लबने सांगितले.
41 वर्षीय गेरार्ड गेल्याच महिन्यात या क्लबमध्ये सामील झाले आहेत. आयसोलेशनमध्ये असल्याने त्यांना रविवारचा चेल्सीविरुद्धचा आणि मंगळवारी होणारा लीड्स युनायटेडविरुद्धचा सामना हुकणार आहे. लिव्हरपूल व इंग्लंडचे माजी कर्णधार असलेल्या गेरार्ड यांनी या संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर व्हिला संघाने सहा लीग सामन्यात चार विजय मिळविले आहेत. व्हिला सध्या 17 सामन्यांत 22 गुण घेत दहाव्या स्थानावर आहे.









