वृत्तसंस्था/ चेन्नई
1836 ते 1900 या कालावधीत पहिला विश्व बुद्धिबळ विजेता ठरलेला विलहेम स्टिनेझ स्मृती आंतरराष्ट्रीय ऑनलाईनद्वारे घेतली जाणाऱया बुद्धिबळ स्पर्धेत विद्यमान विश्व विजेता ग्रॅन्ड मास्टर मॅग्नस कार्लसन सहभागी होणार असल्याचे फेडेच्या प्रवक्त्याने सांगितले.
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ फेडरेशन आणि चेस 24. कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा 14 ते 17 मे दरम्यान ऑन लाईनद्वारे घेतली जाणार आहे. विद्यमान विश्व विजेता ग्रॅन्डमास्टर कार्लसन व अन्य 20 अव्व्लल बुद्धिबळपटू सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा पुरूष खुली आणि महिला अशा विविध गटात घेतली जाईल. सदर स्पर्धा डबल राऊंड रॉबीन ब्लीझ पद्धतीने खेळविली जाणार असून या स्पर्धेचे समालोचन सहा भाषांमध्ये केले जाणार आहे.









