फक्त 79 टक्के इतकी सब्सक्रिप्शन मिळाले
मुंबई
मागील दोन वर्षातील सर्वात कमी प्रतिसाद हा स्टार अलाइड हेल्थ इन्शुरन्सच्या नावावर आहे. याचा इश्यू शुक्रवारी बंद झाला आहे. अंतिम दिवसापर्यंत फक्त 79 टक्के इतकी सब्सक्रिप्शन मिळाला आहे. म्हणजे या सर्व घडामोडींमध्ये राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक होती.
स्टार अलाइड हेल्थ इन्शुरन्स बाजारात 7,249 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीने उतरली होती. या अगोदरच्या दिवसात फक्त 24 टक्के आणि दुसऱया दिवपार्यंत 36 टक्के सब्सक्रिप्शन मिळाले होते. या अगोदर 2019 मधील ऑगस्ट मध्ये सायरस मिस्त्रीची कंपनी स्टर्लिंग ऍण्ड विल्सन यांना सर्वात कमी प्रतिसाद दिला होता.
अन्य आयपीओंना प्रतिसाद
चालू वर्षात पेटीएमला 1.89 पट ऍसजेएसला 1.89 पट आणि फिनो पेमेन्टच्या इश्यूला 2.03 पट सब्सक्रिप्शन मिळाले होते. ज्यामध्ये केमप्लास्टचा आयपीओ 2.17 पट , नुवोको विस्टा 1.71 पट, मॅक्रोटेक डेव्हलपर्स 1.36 आणि सुर्योदय इश्यूला 2.37 पट प्रतिसाद मिळाल्याची माहिती आहे.
चालू वर्षातील तिसरा मोठा इश्यू
स्टार हेल्थ चालू वर्षातील तिसरा सर्वात मोठा इश्यू राहिला आहे. यामध्ये 7,249 कोटी उभारणार आहे. या अगोदर पेटीएमने 18,300 आणि झोमॅटोने 9,350 कोटी रुपये उभारले होते. स्टार प्रमोटर्सकडे 62.80 टक्के हिस्सेदारी आहे.









