देशातील सहा विमा कंपन्या झाल्या लिस्टेड
मुंबई
स्टार हेल्थ ऍण्ड अलाइड इन्शुरन्स कंपनीचा आयपीओ 30 नोव्हेंबर रोजी खुला होणार आहे. तर 2 डिसेंबर रोजी बंद होणार असल्याची माहिती आहे. तसेच 10 डिसेंबर रोजी या कंपनीचे समभाग शेअर बाजारात लिस्टिंग होण्याची माहिती आहे. या कामगिरीमधून कंपनी 7,500 कोटी रुपये उभारण्याचे संकेत आहेत. यामध्ये भाव हा 870 ते 900 रुपये इतका निश्चित केला असल्याची माहिती आहे.
साधारणपणे देशातील सहा विमा कंपन्या लिस्टेड झाल्या आहेत. यामध्ये स्टेट बँक लाईफ, एचडीएफसी लाईफ, न्यू इंडिया अशुरन्स, आयसीआयसीआय प्रूडेंशियल लाईफ, जीआय आणि आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स यांचा समावेश आहे. यासह स्टार हेल्थचा आयपीओ चालू वर्षातील तिसरा सर्वात मोठा इश्यू राहणार आहे. पेटीएमने 18,300 आणि झोमॅटोने 9,375 कोटी रुपये चालू वर्षात आयपीओच्या माध्यमातून जमा केले आहेत.
झुनझुनवालाची गुंतवणूक
स्टार हेल्थमध्ये बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा यांच्या जवळ 17.26 टक्के हिस्सेदारी आहे.
स्टार हेल्थची बाजारातील हिस्सेदारी
स्टार हेल्थ इन्शुरन्सची 31 टक्के इतकी बाजारात हिस्सेदारी आहे. कंपनीच्या एकूण प्रीमियममध्ये 31.4 टक्के वाढ मागील तीन वर्षात राहिली असल्याची माहिती आहे.









