नवी दिल्ली
देशात स्टार्टअपमध्ये नव्याने गुंतवणूकीत वाढ होताना दिसते आहे. स्टार्टअपमध्ये गुंतवणूकीची मात्रा वार्षिक स्तरावर 11 अब्ज डॉलरवरून 36 अब्ज डॉलर्सवर पोहचली आहे. सरकारने यासंबंधीची माहिती नुकतीच दिली आहे. जगातील स्टार्टअपमध्ये येणाऱया गुंतवणूकीचे प्रमाण 4 टक्क्याऐवजी आता 6 टक्के झाले आहे. देशात स्टार्टअप सुरू करण्यासाठी अनेक कंपन्या इच्छुक आहेत. एक वर्षाच्या तुलनेत याखेपेस स्टार्टअपमध्ये गुंतवणूक तिप्पट वाढली आहे. 11 अब्ज डॉलर्सवरून 36 अब्ज डॉलर्सपर्यंत या क्षेत्रात गुंतवणूक वाढली असल्याचे दिसले आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी स्टार्टअपसंदर्भातील नियमांबाबत अधिकाधिक जणांनी आपले मत मांडावे असे आवाहन केले आहे.









