उन्हाळ्यात फ्लोरल प्रिंट फॅशनचा एक भाग बनून जाते. फ्लोरल प्रिंटवाले टॉप्स, कुर्ते, टी शर्ट खूपच सुंदर दिसतात. इतकंच नाही तर फुलाफुलांचे हे कपडे रणरणत्या उन्हातही ताजेपणाची अनुभूती देतात. फ्लोरल्समध्ये थोडे प्रयोग करायचे असतील तर तुम्ही फ्लोरल प्रिंटवाल्या पॅंट ट्राय करू शकता. या पॅंट वेगवेगळ्या पद्धतीने कॅरी करता येतील. अनेक बॉलिवूड दीवाजही अशा पद्धतीने फ्लोरल पॅंट कॅरी करताना दिसतात. त्यांच्याचकडून काही टिप्स घेऊ…
- मध्यंतरी करिश्मा कपूरने रंगीबेरंगी फ्लोरल पॅंट आणि पांढरा शर्ट घातला होता. तिने यावर लांब नेकलेस घातला होता. रात्रीच्या आउटिंगसाठी किंवा एखाद्या पार्टीला जाताना हा लूक कॅरी करता येईल.
- अनन्या पांडेने हाय वेस्ट फ्लोरल डेनिम कूलाट्स आणि रंगीत फ्लोरल टी शर्ट घातला होता. मोजका मेक अप आणि मोकळे केस अशा लूकमध्ये अनन्या खूपच सुंदर दिसत होती. तुम्हीही हा लूक अगदी सहज कॅरी करू शकता.
- क्रिती सेनॉनने अत्यंत कॅज्युअल रिप्ड डेनिम फ्लोरल पँट घातली होती. त्यावर तिने प्लेन पांढरा टी शर्ट घातला होता. खरेदी किंवा भटकंतीला जाताना असा लूक कॅरी करता येईल. आवडत असल्यास क्रॉप टॉपही घालता येईल.
- दीपिका पदुकोणने पांढरी फुलाफुलांची फ्लोरल पँट घातली होती. तिचा हा लूक उन्हाळ्यासाठी अगदी परफेक्ट मानला जात आहे. अशा पँटवर वेगवेगळ्या रंगाचे टॉप्स, टी शर्टस घालता येतील.
- करिना कपूरने पिवळ्या रंगाची फ्लेअर्ड फ्लोरल पँट कॅरी केली होती. त्यावर तिने येलो टॉप घातला होता. हा लूकही हटके आहे. मैत्रिणींनो, तुमच्या वॉर्डरोबमध्ये फ्लोरल पॅंटला स्थान असायलाच हवं.









