वृत्तसंस्था/ कैरो
येथे सुरू असलेल्या पीएसए विश्व स्क्वॅश स्पर्धेंत सहभागी झालेली भारताची महिला स्क्वॅशपटू ज्योश्ना चिन्नाप्पाने प्रकृती नादुरूस्तीमुळे उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीतून माघार घेतली आहे.
महिला स्क्वॅशपटूंच्या मानांकन यादीत 12 व्या स्थानावरील ज्योश्ना चिन्नाप्पाचा सामना इजिप्तच्या रोव्हेन इलेरबायशी होणार होता. पण प्रकृती बिघडल्यामुळे तिने या स्पर्धेतून माघार घेतली. या स्पर्धेत चिन्नाप्पाने पहिल्या फेरीतील सामन्यात इंग्लंडच्या मेलिफचा 3-0 तर त्यानंतरच्या पुढील फेरीतील सामन्यात वेल्सच्या 18 व्या मानांकित इमेली व्हिटलॉकचा 3-0 असा पराभव केला होता. या स्पर्धेत महिला विभागातील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे तर पुरूष विभागात भारताच्या सौरव घोशालने उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.









