मुंबई
स्कोडा ऑटो इंडियाची रॅपिड एटी ही नवीन गाडी पुढच्या महिन्यामध्ये विक्रीकरिता उपलब्ध होणार असून यासाठीच्या आगाऊ बुकिंगला सुरुवात झाली आहे. कंपनीने ही गाडी खरेदी करण्यासाठी बुकिंग खिडकी उघडली असून 25 हजार रुपये भरून ग्राहकांना ही गाडी बुक करता येईल. देशभरातील अधिकृत विपेत्यांकडे किंवा स्कोडा ऑटो इंडियाच्या संकेतस्थळावर गाडीचे बुकिंग ग्राहकांना करता येणार आहे. गाडी बुक केलेल्या ग्राहकांना तिचे वितरण 18 सप्टेंबरनंतर केले जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. गेल्या मेमध्ये स्कोडाने रॅपिड गाडीचे लाँचिंग केले होते, जिची किंमत 7.49 लाख रुपये इतकी आहे. ही गाडी हुय़ंडाईच्या वेर्णा, फोक्सवॅगनच्या वेंटो, होंडाच्या सिटी कार्सना टक्कर देईल असं सांगितलं जात आहे. उत्तम दर्जात्मक बांधणी तसेच आवश्यक सुरक्षिततेचे उपाय गाडीत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. गाडी चालवण्यास आरामदायी असून त्यात ऐसपैस जागाही असल्याचे कंपनीने सांगितले.









