क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन आयोजित रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंगपटूंनी 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 13 कांस्यपदकांसह एकूण 16 पदके पटकावली. 15 आणि 16 जानेवारी रोजी गोवा मिरामार पणजी येथील युथ हॉस्टेल स्ट्रीटवर ही स्पर्धा घेण्यात आली होती.
स्पीड स्केटिंगमध्ये विधीत कल्याणकुमार बी. याने 2 सुवर्ण, वरद कोलमकरने 1 रौप्य व 1 कांस्य, लावण्या लोहारने 2 कांस्य, ध्रुव कुलकर्णीने 2 कांस्य, पल्लवी पाटीलने 2 कांस्य, ओमसाई लाडने 1 कांस्य, अथर्व भुतेने 1 कांस्य, सोहन हिरेमठने 1 कांस्य, साईसमर्थ आजाना हिने 1 कांस्य तर शुभम साखेने 2 कांस्यपदके पटकाविली.
सर्व स्केटिंगपटू मागील 3 वर्षापासून केएलई सोसायटी संचालित लिंगराज कॉलेजच्या स्केटिंग रिंकवर तसेच गोवावेस येथील रोटरी, कार्पोरेशन स्पोर्ट्स अकॅडमी आणि गणेशपूर रोड येथील गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल इंटरनॅशनल स्केटिंग ट्रकवर स्केटिंगचा सराव करीत आहेत.
त्यांना डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार श्याम घाटगे, राज घाटगे, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर यांचे प्रोत्साहन आणि प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, भरत पाटील, अनुष्का शंकरगौडा, सक्षम जाधव, शुभम साखे आणि सोहम हिंडलगेकर यांचे मार्गदर्शन लाभत
आहे.









