नातेवाईकांकडे जात असताना काळाचा घाला, देवसू येथील घटना
प्रतिनिधी/ पेडणे
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ते विभाग पेडणेच्या हलगर्जीपणामुळे गतिरोधकावरील सफेद पट्टे रंगविले नसल्याने रविवारी 27 रोजी सकाळी 11.30 वाजता प्रज्ञा हायस्कूल देवसू जवळ दुचाकीवर मागे बसलेली महिला रस्त्यावर उसळून फेकून पडली. तिच्या डोक्मयाला गंभीर इजा होऊन मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. प्रमोधिनी प्रभाकर ठाकूर (वय 55) असे मयत महिलेचा नाव आहे.
यासंबंधीची माहिती अशी की पालडोस्करवाडा धारगळ येथील प्रभाकर ठाकूर व त्याची पत्नी प्रमोधिनी ही दोघेही ऍक्टिव्हा दुचाकीने हरमल येथे नातेवाईकांच्या घरी जात होती. प्रमोधिनी यांच्या हरमल येथे असलेल्या मावशीच्या मुलीचे चार दिवसांपूर्वी निधन झाले होते. मावशीला भेटण्यासाठी प्रभाकर व प्रमोधिनी ही पेडणेहून कोरगावच्या रस्त्याने जात असताना कोनाडी चढती संपल्यानंतर प्रज्ञा हायस्कूल जवळ असलेल्या गतिरोधक लागतो. रस्त्यावर असलेल्या गतिरोधकाचा रंग सफेद पट्टे दिसत नसाल्याने चालकाला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने अ?क्टिव्हा स्पिडब्रेकरवर हलली व तोल गेल्याने मागे बसलेली प्रमोधिनी ही रस्त्यावर फेकली गेली असता तिच्या डोक्मयाला गंभीर स्वरुपाची इजा झाल्याने मोठय़ा प्रमाणात रक्तस्त्राव झाला. अपघाताची माहिती गलेच 108 रुग्णवाहिकेला दिली. 108.रुग्णवाहिकेने तिला तुये येथील आरोग्य केंद्रात नेत असतानाच तिचे वाटेतच निधन झाले.
मयत प्रमोधिनी यांना पती , दोन एक मुलगी व दोन मुलगे असा परिवार आहे. पेडणे पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक संजित कांदोळकरा यांनी अपघाताचा पंचनामा करुन मृतदेह बांबोळी येथे गोवा वैद्यकीय इस्पितळात शवचिकित्स?साठी पाठवून दिला.
सरकारच्या हलगर्जीपणामुळे गेला महिलेचा बळी
पेडणे तालुक्मयात असलेल्या गतिरोधकाचे रंग उडून गेल्याने अनेक अपघात आतापर्यंत झाले आहेत.माञ पेडणे सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाला यांचे काहिच सोयरसुतक नाही. रविवारी देवसू येथे गतिरोधकामुळे झालेले अपघात विनाकारण महिलेचा बळी गेला आहे. संबंधित खात्याने पेडणे तालुक्मयातील गतिरोधकाचे रंगकाम व त्यावर पट्टे मारवे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कोरगाव पंचायतीने पंचायत क्षेत्रातील गतिरोधक रंगविण्यासाठी पाच महिन्यापूर्वी पेडणे सार्वजनिक रस्ते विभागाला पञः सरपंच स्वाती गवंडी
कोरगाव पंचायत क्षेत्रातील रस्तावर असलेले गतिरोधकांवर सफेद पट्टे मारावे यासाठी कोरगाव पंचायतीच्या सरपंच स्वाती गवंडी यांनी पेडणे सार्वजनिक बांधकामा खात्याच्या रस्ते विभागाला पञ पाठवून मागणी केली होती.माञ अजूनपर्यंत यावर संबधीत कार्यालयाकडून कार्यवाही झाली नसल्याचे सरपंच स्वाती गवंडी यांनी सांगितले.
अपघातास कारणीभूत ठरवून पेडणे सार्वजनिक बांधकाम स्ते विभागाच्या अधिका-यावर मनुष्य वधाचा गुन्हा नोंद करावाः
वकिल सीताराम परब
रविवारी देवसू येथे गतिरोधकावर आपघात घडून ज्या महिलेचा बळी गेला त्याला पूर्णपणे पेडणे सरकार बांधकाम रस्ते विभाग जबाबदार असून त्यांच्या हलगर्जीपणामुळे आज एका महिलेचा विनाकारण बळी गेला आहे.सरकार यंञणा किती सुस्त आणि बेफिकीर आहे याचा प्रत्यय आज आला असून जर गतिरोधक रंगविले असते तसेच साईनबोर्ड असते तर हा बळी गेला नसता. या आपघातास पेडणे सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाला जबाबदार धरत संबंधित अधिकाऱयांवर मनुष्य वधाचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी समाजसेवक तथा वकिल सीताराम परब यांनी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभारामुळे गेला बळीः भावार्थ मांदेकर
भटवाडी कोरगाव येथील शिक्षक भावार्थ मांदेकर यांनी सराकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ते विभागाच्या हलगर्जीपणामुळे देवसू येथे गतिरोधकावर पडून हा बळी गेल्याचे सांगितले . सरकार वाहन चालकाकडून वाहन कर घेते.माञ नागरिक व वाहन चालकांना सुविधा देत नाही सर्वत्र रस्ते हे खड्डेमय असून तालुक्मयात ज्या ज्या ठिकाणी गतिरोधक आहेत तिथे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. गतिरोधकावरील पट्टे दिसत नसल्याने अनेक आपघात घडत आहेत.माञ संबंधितते बेफिकीरपणे वावरत असल्याने नागरिकांचे नाहक बळी जात असल्याची प्रतिक्रिया भावर्थ मांदेकर यांनी दिली.
गातिरोधकाची योग्य उंची असावीः विठू मोरजकर
काँग्रेस प्रवक्ते विठू मोरजकर यांनी देवसू येथे अपघात गेलेल्या महिलेच्या निधनाबद्दल सरकारी यंञणेला जबाबदार धरत गतिरोधकांची उंची जास्ता असल्याने तसेच या गतिरोधकावरील रंग व पट्टे उडून गेल्याने हे अपघात घडत आहेत. यावर सरकारच्या सार्वजनिक बांधाकाम खात्याचे लक्ष नसल्याने आज एका निष्पाप महिलेचा बळी गेला असून सरकारने त्वरित पेडणे तालुक्मयातील सर्व रस्त्यावर असलेले गतिरोधक रंगवून त्यांची उंची योग्य अशी ठेवावी अशी मागणी केली.
देवसू येथील नागरिकांनी रंगविले दोन्हीही गतिरोधक
आपघातात बळी गेलेल्या महिलेबद्दल हळहळ व्यक्त करत आज देवसू येथील आंतोनिओ डायस या नागरिकाने तसेच देवसू येथील युवकांनी एकञ येऊन आज स्वतः सफेद रंग विकत आणून देवसू येथील प्रज्ञा हायस्कूल जवळ असलेले दोन्हीही गतिरोधकावर पट्टे मारले.









