फॅशनविश्वात स्कर्ट हा तसे पाहिल्यास एव्हरग्रीन पर्याय आहे. तरुणी आणि मध्यम वयोगटातील महिलांसाठी तो अत्यंत कम्फर्टेबल असल्याने त्याची लोकप्रियताही मोठी आहे. गेल्या काही वर्षांत लाँग स्कर्ट, शॉट स्कर्ट, घेरदार स्कर्ट असे बरेच प्रकार यामध्ये बघायला मिळतात. पण आपल्या शरीरयष्टीनुसार योग्य स्कर्टची निवड केली तर व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसण्यासाठी मोठी मदत होते.
- स्ट्रेट बॉडी : ज्यांचा बांधा सडपातळ आणि उंच आहे. अशा महिलांनी ए लाईन्स स्कर्ट किंवा प्लिटेड स्कर्टची निवड करावी. पॉकेट असलेल्या स्कर्टचीसुद्धा अशा तरुणींना निवड करता येते. तसेच पेन्सिल स्कर्ट आणि त्यावर मॅच होणारे बेल्टसुद्धा घालता येऊ शकतात. तसेच प्रिंट आणि पॅटर्न असलेले जिओमेट्रिक्स लाईन्स असलेले पोल्काडॉट असलेले स्कर्टसुद्धा निवडता येऊ शकतात. फॅब्रिकमध्ये क्रिस कॉटन आणि लिननची निवड करावी.
- पिअर शेड बॉडी : अशा महिलांनी सडपातळ लूकसाठी डार्क कलरचे स्कर्ट घालावेत. ए लाईन पॅटर्न त्यांच्यासाठी चांगला ठरू शकतो. अशा महिलांनी मोठय़ा प्रिंट्स आणि मोठय़ा प्लिट्स असलेल्या स्कर्टची निवड कधीही करू नये.
- ऍपल बॉडी टाईप : अशा महिलांनी नी लेन्थ स्कर्ट, ए लाईन फ्लेअर्ड स्कर्ट, बियास कट स्कर्ट, रॅप आणि पॅनड स्कर्टची निवड करावी. स्लिक, जर्सी, वूल किंवा सॉप्ट कॉटन अशा फॅब्रिकची निवड करावी. या महिलांनी मोठय़ा प्रिंटचे आणि फ्लिट असलेले स्कर्ट निवडू नयेत. ब्लू, ब्लॅक किंवा गडद जांभळा असे रंग निवडावेत, त्यामुळे सडपातळ लूक येतो.
- कर्व्ही बॉडी शेप : अशा महिला पेन्सिल स्कर्ट, ए लाईन स्कर्ट, फुल स्कर्ट असे सर्व प्रकार घालू शकतात. स्लिक, कॉटन यासारखे फॅब्रिक वापरलेल नी लेन्थ स्कर्टसुद्धा निवडायला हरकत नाहीत. उंची अधिक असल्यास हाय हिल सॅन्डलवर गुडघ्याच्यावर स्कर्ट घालू नयेत. अन्यथा अधिक उंची भासेल.









