राजकोट : 20 फेब्रुवारीपासून खेळविल्या जाणाऱया विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी सौराष्ट्र क्रिकेट संघटनेने गुरूवारी सौराष्ट्रच्या संघाची घोषणा केली. 20 जणांच्या या संघाचे नेतृत्व जयदेव उनादकटकडे सोपविण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी सौराष्ट्र संघामध्ये चेतन साकारिया आणि धमेंद्रसिंग जडेजा तसेच अर्पित वासवदा, चिराग जैनी, पी. मंकड, बारोस आणि विश्वरसिंग जडेजा यांचा समावेश आहे. 2020-21 च्या विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेला शनिवार 20 फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. सदर स्पर्धा सुरत, इंदोर, बेंगळूर, जयपूर, कोलकाता आणि तामिळनाडू या ठिकाणी खेळविली जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणारे संघ पाच इलाईट आणि एक प्लेट गटात विभागाण्यात आले आहेत.
स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीचे सामने 8-9 मार्चला तर उपांत्य सामने 11 मार्चला तर अंतिम सामना 14 मार्चला खेळविला जाईल.
सौराष्ट्र संघ- जयदेव उनादकट (कर्णधार), बारोत, जेनी, धमेंद्रसिंग जडेजा, जय चौहान, पार्थ भट्ट, अयाची, एस. पटेल, किशन परपार, बराद, के.पटेल, पार्थ चौहान, देवांग कर्मता, एच. देसाई, वासवदा, कमलेश मकवाना, विश्वरसिंग जडेजा, साकारिया, मंकड आणि डी. चौहान.









