ऑनलाईन टीम / कोलकाता :
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष व भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्याकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात कोलकातामधील गरजूंना पन्नास लाख रुपयांचा तांदूळ पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना व्हायरसपासून सुरक्षिततेसाठी राज्य सरकारच्या शाळांमध्ये ठेवण्यात आलेल्या गरजूंना हे धान्य देण्यात येणार आहे. दरम्यान, क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे अध्यक्ष अविशेक दालमिया यांनीदेखील पश्चिम बंगाल राज्य सरकारला अनुक्रमे 25 आणि 5 लाख रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.








