ऑनलाईन टीम / अबू धाबी :
भारतीय रेल्वेने चिनी कंपनीला दिलेले ’44- सेमी हायस्पीड वंदे भारत’ रेल्वेगाड्या बनवण्याचे कंत्राट रद्द केल्यानंतर सौदी अरेबियानेही चीनला झटका दिला आहे. सौदीची सार्वजनिक तेल कंपनी अरामकोने चीनसोबतचा 10 अरब डॉलरचा (75 हजार कोटी) करार सध्या रद्द करण्याचा निर्णय अरामकोने घेतला आहे.
फेब्रुवारी 2019 मध्ये चीन आणि सौदी अरेबियामध्ये हा करार झाला होता. त्यावर सौदीचे राजकुमार सलमान यांनी स्वाक्षरी केली होती. अरामको कंपनी या करारानुसार चीनमध्ये एक रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल्स काँप्लेक्स बनवणार होती.
कोरोनामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किंमती कमी झाल्याने तेल कंपन्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने अरामको कंपनीने चीनसोबतचा हा करार सध्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हा करार रद्द झाल्यामुळे चीनला मोठा फटका बसणार आहे.