ऑनलाईन टीम / रियाध :
सौदी अरेबियाने त्यांच्या नोटेवर भारताचा भूभाग चुकीच्या पद्धतीने छापला आहे. भारताच्या नकाशात सौदीने जम्मू-काश्मीरचा भाग आक्षेपार्ह दाखवला आहे. भारताने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, रियाधमधील राजदूताकडे फिर्याद दिली आहे. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
येत्या 21 आणि 22 नोव्हेंबरला जी-20 देशांची परिषद सौदी अरेबियात होत आहे. यंदा या परिषदेचे अध्यक्षपद आणि यजमानपद सौदी अरेबियाकडे असल्याने बहुमानाप्रीत्यर्थ सौदी अरेबियाने ही नोट छापली आहे. मात्र, ही नोट छापताना सौदीने भारताचा भूभाग चुकीच्या पद्धतीने दाखवला आहे.
नकाशात काश्मीर भारतापासून वेगळा दाखवण्यात आल्याने भारताने यावर आक्षेप घेतला आहे. सौदीची राजधानी रियाधमधील भारताच्या राजदूताकडे आणि दिल्लीतील सौदीच्या राजदूताकडे ही तक्रार नोंदवण्यात आली असून, आवश्यक बदल करण्यास सांगितले आहे.









