ओटवणे / प्रतिनिधी:
ओटवणे जाधववाडी येथील सौजन्य सत्यवान जाधव याची सिंधुदुर्ग जिल्हा टेनिस क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. यानिमित्त त्याचे ओटवणे परिसरातून अभिनंदन होत आहे.
दरम्यान नाशिक येथे २३ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत तो खेळणार असुन या स्पर्धेसाठी तो नाशिक येथे रवाना झाला आहे. सौजन्य जाधव हा प्राथमिक शिक्षक सत्यवान जाधव यांचा मुलगा असून त्याला सावंतवाडी क्रिकेट ॲकॅडमीचे प्रशिक्षक श्री रेगे, दिनेश कुबडे व महेश डोंगरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
Previous Articleनेपाळच्या विदेशमंत्रिपदी नारायण खडका
Next Article कोल्हापूर जिल्ह्यात 48 नवे रुग्ण, सहा मृत्यू









