फेसबुककडून 1.16 कोटीपेक्षा अधिक कंटेंट तर व्हॉटसऍपकडून 18.58 लाख खाती निष्क्रीय
नवी दिल्ली
फेसबुकची सहयोगी कंपनी मेटाने जानेवारीत भारतामधील 13 प्रकारच्या पॉलीसी न मानल्यामुळे फेसबुकवरील 1.16 कोटीपेक्षा अधिक कटेंटवर कारवाई केली आहे. यामध्ये बुलिंग आणि लहान मुलांना धोकादायक ठरणारी माहिती, धोकादायक संस्था आणि लैंगिक संदर्भातील माहितीचाही यात समावेश राहिला आहे. तसेच व्हॉटसऍपनेतर भारतीयांची 18.58 लाख खाती निष्क्रिय केली आहेत.
मेटाच्या आयटी नियमानुसार अहवालामध्ये दुसऱया क्षेत्रात जेथे कंटेंटवर कारवाई केली होती, ज्यामध्ये भाषण, आत्महत्या आणि सेल्फीमधील फोटो तसेच हिंसा दर्शवणाऱया ग्राफिक्स कंटेंटचा यामध्ये समावेश राहिला आहे.
1.16 कोटी कंटेंटवर कारवाई सुरु
मेटाच्या माहितीनुसार फेसबुकने 1 ते 31 जानेवारी दरम्यानच्या वर्गवारीमध्ये 1.16 कोटीपेक्षा अधिक कंटेंटवर कारवाई केली आहे. ज्यामध्ये इंस्टाग्रामकडून याच दरम्यान 12 वर्गवारीतील 32 लाख कंटेंटच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.









