सातारा / प्रतिनिधी
सोशल मीडिया अलीकडे कोणीही वापरतात. मात्र,याच मीडियाचा चुकीचा वापर करून आत्महत्या करायला भाग पडणाऱ्या एका युवकास सातारा पोलिसांनी जेरबंद केले आहे.अटक कलेलेल्या संशयित आरोपीचे नाव आकाश प्रकाश माने केंडे (वय 20 रा.शिवाजीनगर शाहूपुरी) असे आहे. तब्बल सव्वा तीन महिन्यांनी या गुन्ह्याची उकल पोलिसांनी केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. २४ फेब्रुवारी२०२० रोजी सांय.5.30 वा.चे सुमारास प्रथमेश माधवदत्त बेंद्रे (वय-२० प्लॉट नं.८ शिवाजीनगर शाहुपुरी) यांने घरात बेडरुममध्ये फॅनला नायलॉन दोरीने गळफास घेवुन आत्महत्या केली होती.याबाबत शाहुपुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू असे दाखल करण्यात आलेले आहे. याच्या चौकशीमध्ये प्रथमेशला कोणीतरी अज्ञात व्यक्ती ही सानिका के या नावाने फेसबुकवर अकौन्टवरुन चटींग करुन अश्लील मेसेज करत होती. प्रथमेशला त्याच्या बहीणीचा नंबर मागुन मानसिक त्रास देत असल्याचे तसेच पोलीसांत तक्रार करण्याची धमकी देत असल्याचे दिसुन आले. याबाबत पोलीस अधिक्षक
सातारा तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधिक्षक धिरज पाटील, सहायक पोलीस अधिक्षक सातारा समीर शेख यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सायबर सेल सातारा येथे पत्रव्यवहार करुन तांत्रिक विश्लेषणाव्दारे गुन्हयातील अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात आलेला आहे.
प्रथमेश बेंद्रे यास आकाश माने याने त्याच्या बहिणीचा मोबाईल नंबर वारंवार मागुन तसेच प्रथमेशबाबत पोलीसात तक्रार
केली असल्याची धमकी देत होता. तसेच तो अश्लील फोटो पाठवुन मानसिक त्रास देऊन प्रथमेशला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाले. बनावट सानिका के नावचे अकाऊंट तयार करणारा आकाश माने याच्यावर शाहुपुरी
पोलीस ठाण्यात गु.र.न.२१३/२० भादवि कलम ३०६,४१७,२९२(अ),माहिती तंत्रज्ञान अधि.२०००चे कलम ६६ (सी) ६६(डी) ६७ (अ)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हयातील आकाश याला गुन्हा दाखल होताच अटक करण्यात आलेली आहे. गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक सजन हंकारे हे करीत असुन सदर गुन्हयाचे तपासामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, सहाय्यक फौजदार शामराव भंडारे, सायबर सेलचे पो.ना. अमित झंडे, पोहवा अतिश घाडगे, पो.ना. श्रीनिवास देशमुख,पो.कॉ. सतीश बाबर
पो.कॉ. सुनिल भोसले यांनी सहभाग घेतला आहे.
सोशल मीडियावर सावधान
अशा प्रकारे सोशल मिडीयावरिल आमिषांना, भुल थापांना प्रलोभित होऊन कोणीही अशा प्रकारचे चुकीचे कृत्य करु नये. तसेच,बॅकेतुन बोलत आहे,लॉटरी लागली आहे,असे येणारे बनावट फोन कॉल,एसएमएस, ऑनलाईन लिंक यावर आपली कोणतीही खाजगी माहीती, अकौन्ट नंबर, आधार नंबर, ओटीपी देऊ नये अशा प्रकारे होणारे ऑनलाईन फसवणुकी पासुन सावध राहवे असे आवाहन शाहुपुरी पोलीस ठाणेचे
वतीने करण्यात येत आहे.









