वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे मुष्टीयोद्धे गौरव सोळंकी, सोनिया, सिमरनजीत कौर यांची अखिल भारतीय मुष्टीयुद्ध फेडरेशनने अर्जुन पुरस्कारांसाठी शिफारस केली आहे. दरम्यान राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारांसाठी मुष्टीयुद्ध फेडरेशनकडून एकाही मुष्टीयोद्धय़ाची शिफारस अद्याप करण्यात आलेली नाही.
सिमरनजीत कौरने 2018 च्या विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत 60 किलो वजन गटात कास्यपदक मिळविले होते. टोकियो ऑलिंपिकसाठी तिची यापूर्वीच भारतीय पथकामध्ये निवड झाली आहे. भारतीय क्रीडा क्षेत्रातील विविध पुरस्कारांसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 21 जून ठेवण्यात आली होती.









