मंगळवेढा तालुक्यातील घटना, ग्रामीण भागात भितीचे वातावरण
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / मारोळी
मंगळवेढा तालुक्यातील ३ गावात लांडग्याने जीवघेणा हल्ला केल्याने अंदाजे १० जण गंभीर आहेत. तसेच जनावंरावर व काही कुत्र्यावर ही हल्ला केल्याचे समजते. सलगर खुर्द, बावची माळवाडी,पौट (ता. मंगळवेढा ) या गावात रात्री १२ ते २ च्या दरम्यान लांडग्याने हल्ला केल्याचे समजते.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती अशी कि, सलगर खुर्द मधील तुकाराम खडतरे( वय ६८ ), जयहिंद तुकाराम खडतरे (४o), अक्षय जयहिंद खडतरे (वय १३), संगिता जयहिंद खडतरे (वय ३२)यांच्यावर रात्री एक वाजता लांडग्याने प्राणघातक हल्ला केला. खडतरे कुटुंब बाहेर व्हरांड्यात झोपलेले असताना कुटुंबातील चौघांवर जीवघेणा हल्ला झाला. त्यानंतर जोरजोरात किंचाळण्याच्या आवाजाने शिवाजी देव्वाप्पा व्हनवटे हे पळत आले. त्यांनी काठीने लांडग्याला ठार केले. बावची येथील अनिता बसवराज माळी, (वय ३८) पारूबाई इरांना माळी ( वय ४०), यशराज राजू फोंडे( वय १२), सुखदेव सिध्दू जाधव ( वय ६५), तानाजी श्रीरंग चव्हाण ( वय ४२ ), भारत विठोबा म्हमाणे ( वय ४५)(रा.पौट) अशी जखमींची नावे आहेत. गंभीर जखमी असणाऱ्यांना सोलापूरला नेण्यात आले आहे.

तसेच घटनेची माहिती पोलीस पाटील आणि सरपंच यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्याला दिली. पोलीसांनी घटनास्थळी भेट देवून जखमींना उपचारासाठी सोलापूरमध्ये दाखल करण्यासाठी रवाना केले. घटनास्थळी वनखात्याचे अधिकरी दाखल होऊन पुढील कारवाई करत आहेत.
घटना समजताच तात्काळ घटनास्थळी जाऊन मंगळवेढा पोलीस स्टेशनला कळवले व लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.पौट व बावची येथे ०६ जणांवर लांडग्याने हल्ला केला आहे.जखमींना उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. लांडग्याने पाळीव जनावरे व कुत्र्यांवरही हल्ला केला आहे. घटनास्थळी रात्री पोलीस नाईक सलगर यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
महावीर भोसले, पोलीस पाटील, बावची (ता.मंगळवेढा)









