११ लाख ३८ हजार चाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / बोरगाव
हैद्रा ता. अक्कलकोट येथील गुरप्पा हचडद यांचे शेतामध्ये खुले जागेत शुक्रवारी रात्री साडेअकरा वा चे सुमारास विजेच्या प्रकाशात जुगार खेळत असलेल्या १६ जणांना पकडले असून त्यांच्याकडून रोख रक्कम कार, मोटारसायकल वाहनासह ११ लाख ३८ हजार चाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. याची दक्षिण पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली असून जुगार अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलीस सुत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, हैद्रा गावाजवळील एका रोगडलगतचे शेतामध्ये रात्री साडेअकरा वाजता विजेच्या प्रकाशात मोकळ्या जागेत सोळा ईसम गोलाकार रिंगण करुन जुगार खेळत होते. गराडा घालून पथकाने जागीच पकडले. यामध्ये सैपन मकानदार (वय ४०) रा. हैद्रा, नागराज टेंगळे(वय ३२) रा. माशाळ कर्नाटक, सागर मोसलगी (वय २२) रा. माशाळ कर्नाटक, सुनिल राठोड (वय २५) रा. माशाळ कर्नाटक, भागप्पा चांभार (वय ४८) रा. हैद्रा, सचिन चव्हाण (वय २३) रा. हैद्रा, प्रकाश दुधनीकर (वय ३६) नागणसुर, आकाश चव्हाण (वय ३६)रा. माशाळ, दिलीप राठोड (वय २२)रा. माशाळ, शरणबसप्पा तळवार (वय ३७) रा. अफजलपुर, सिद्रय्या टेगळे (वय ३१) रा. करजगी, काशीम मकानदार (वय ३२) रा. हैद्रा, श्रिशैल आगरखेड (वय ३०)रा. माशाळ, मुजम्मील मुजावर (वय २५)रा. हैद्रा, रवी आळगी (वय २५)रा. हैद्रा, रफीक कुरेशी (वय ३०)रा. माशाळ यांना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून रोख रक्कम रु ७८०४० रूपये व तीन मोटारसाईकल व एक कार त्याची किंमत अंदाजे दहा लाख साठ हजार असे एकूण अकरा लाख अडोतीस हजार ४० रूपये मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला.
विषेश पथक सो.ग्रा. पो. शि. मनोज राठोड यांनी फिर्याद दिली. या पथका पोनि विनय बहिर,पोशि भोईटे, पोशि मदने, पोशी झिरपे, पोशि हेमाडे, यांनी भाग घेतला. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.