मर्चंट नेव्ही अधिकाऱ्यावर हल्ला प्रकरण, पाचही आरोपींच्या मुसक्या आवळल्या
प्रतिनिधी / अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील हालहळळी (अ) येथील मर्चंट नेव्हीतील अधिकाऱ्यावर हल्ला करुन फरार झालेल्या माजी सरपंचासह पाच आरोपीना कर्नाटकात पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी दिल्याची मााहिती पोलीस निरीक्षक अजय देवरे यांनी दिली.
फिर्यादी मर्चंट नेव्हीतील अधिकारी नागनाथ परमेश्वर हुक्केरी सुट्टीसाठी गावी आले असता कट रचून आरोपीने लोखंडी रॉड, दगड, कुऱ्हाड व दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी 23 जुलै रोजी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी माजी सरपंच निलप्पा बिराजदार, त्याची मुले खंडेशा बिराजदार, भागेश बिराजदार, पुतणे मल्लिनाथ बिराजदार, गुरुनाथ बिराजदार (सर्व रा. हालहळळी अ.) हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. पोलिसांनी आरोपींचा जिल्ह्यात, परजिल्ह्यात शोध घेतला. परंतु आरोपी मिळून आले नव्हते. त्यामुळे पोलीस निरीक्षक राजेश देवरे यांनी त्यांना अटक करण्याची जबाबदारी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या डी. बी. पथकास दिली होती. सपोनि विलास नाळे व डी. बी. पथकातील पोलिसांनी कन्नाळ (ता. इंडी, जि. विजापूर) येथे धडक मारली.
आरोपी हे गावाबाहेरील एका शेतातील तुरीच्या पिकात लपून बसले होते. पोलीस येत असल्याचे कळताच ते पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांचा पाठलाग करुन पाचही आरोपींना ताब्यात घेऊन मुसक्या आवळल्या. ही कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक राजेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे सपोनि विलास नाळे, डी. बी. पथकातील पोहेकॉ सिद्राम धायगुडे, महादेव चिंचोळकर, जगदीश राठोड, प्रमोद शिंपाळे यांनी केली. तपास सपोनि नाळे करीत आहेत.
दिशाभूल करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या
मर्चंट नेव्हीतील अधिकाऱ्यावर हल्ला केलेल्या पाचपैकी एका आरोपीवर यापूर्वी अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याचा हद्दपारीचा प्रस्ताव पूर्वीच दाखल केला आहे. ते पोलिसांची दिशाभूल करीत होते. त्यांना गावातील काही लोकांची साथही होती. तरीही त्यांचा ठावठिकाणा शोधून मुसक्या आवळल्या आहेत.
-विलास नाळे- सहायक पोलीस निरीक्षक, अक्कलकोट
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









