वैराग / प्रतिनिधी:
हत्तीज ( ता बार्शी ) येथे विवाहितेचा चारित्र्याचा संशय घेत तिचा शारीरिक, मानसिक व आर्थिक व्यवहारासाठी जाचहाट करून तिला विहिरीत उडी टाकून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह तिघांच्या विरोधात वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कल्पना प्रशांत खोबरे असे विहीरीत पडून मरण पावलेल्या विवाहितेचे नाव आहे. ही घटना शनिवारी २४ ऑक्टोंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी दोनच्या दरम्यान घडली. याबाबत वैराग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हत्तीज तालुका बार्शी येथे अपसिंगा (ता. तुळजापूर ) येथील भारत खोचरे यांची मुलगी कल्पना हिचा विवाह पाच वर्षापूर्वी प्रशांत बाळासाहेब खोबरे ( रा. हत्तीज, ता. बार्शी ) याच्यासोबत झाला होता लग्नानंतर त्यांना दोन मुली झाल्या. परंतु मला मुलगा व वंशाला दिवा पाहिजे यासाठी नवरा दारू पिऊ लागला. शिवाय रोज शारीरिक-मानसिक त्रास देत माहेरकडून आर्थिक पैशाची मागणी करत त्रास देऊ लागला. हा प्रकार मयत कल्पना ही फोनवरून माहेरच्या लोकांना माहीती देत होती. परंतू तुला दोन मुली आहेत. त्यांच्या साठी त्रास सहन करं असे माहेरचे लोक सांग असत. सासरी खोबरे हे एकत्रित कुटुंबात राहत असल्याने चुलत सासरा नितीन विश्वनाथ खोबरे ,सासू संगीता बाळासाहेब खोबरे हे दोघेही मयत कल्पनावर संशय घेऊन प्रशांत यास मदत करत असत. त्यांचा वाढता व रोज होणारा जाचहाट सहन करीत ‘तुझे वागणे बरोबर नाही ‘ . तुला मुली आहेत. आम्हाला प्रशांतला दुसरे लग्न करायचे आहे .असे वारंवार म्हणून मारहाण, शिवीगाळ करीत त्रास देत होते. या त्यांच्या त्रासाला कंटाळून शनिवारी सकाळी तिने आठ वाजता घर सोडले. डिसले यांच्या ( हत्तीज, ता. बार्शी ) येथील विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली. तिच्या मरणास पती, सासू व चुलत सासरा असे तिघेजन कारणीभूत ठरले. अशी फिर्याद मीना भारत खोचरे ( रा. अपशिंगा, ता. तुळजापूर ) यांनी वैराग पोलिसात दिली. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलिस अधिकारी करीत आहेत
Previous Articleएलजी विंग स्मार्टफोन 28 ऑक्टोबरला भारतात
Next Article आर्थिक वर्षात एलआयसीचा आयपीओ नाही ?









