वैराग / तरुण भारत संवाद प्रतिनिधी:
कोरोना चा प्रादुर्भाव वाढू लागल्याने उशिरा जागे झालेले नागरिक आता लस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी करू लागले आहेत . परंतु शासनाकडूनच मर्यादित स्वरूपात लशीचा साठा येत असल्याने स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी हतबल झाले असून लस संपल्यानंतर आज वैराग येथील डॉक्टरांना लस न मिळालेल्या नागरिकांनी घेराव घातला त्यामुळे सुस्त प्रशासन हतबल जनता म्हणण्याची वेळ आली आहे .
कोरोना च्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र आहाकार पसरलेला असताना शासनाच्यावतीने रुग्ण संख्या वाढू नये म्हणून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या अगोदर पूर्वी ६० वर्षावरील आणि आत्ता ४५ वर्षा वरील रुग्णांना कोरोणा लसीकरण करण्यात येत आहे. सर्व शासकीय दवाखान्या मधून covid-19 लसीकरण करण्यास युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. परंतु जेवढी मागणी आहे तेवढा लसीचा पुरवठा होत नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी व लसीकरणासाठी आलेल्या नागरिक यांच्यात उंबरा तुमच्या प्रसंग निर्माण होत आहेत. त्यामुळे शासनाने लसीकरणाचा वेग वाढवावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
बार्शी तालुक्याला २२ तारखे अखेर ३२११२ लस प्राप्त झाली होती . त्यांपैकी ६० वर्षावरील नागरिकांना पहिला व दुसरा डोस मिळून १५९५७ देण्यात आला आहे .४५वर्षावरील नागरिकांना पहिला डोस ३४३३ देण्यात आला आहे .आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला दुसरा डोस मिळून ६१९५ देण्यात आला आहे . फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना पहिला व दुसरा डोस मिळून २९६४ देण्यात आला आहे .कोमारबीट जणांना पहिला व दुसरा डोस मिळून ३५६३ देण्यात आला आहे.
२२ तारखेनंतर तब्बल पाच दिवसानंतर बार्शी तालुक्याला सोळाशे लस उपलब्ध झाली असून त्यापैकी पानगाव प्राथमिक आरोग्य केंद्र १००, चिखर्डे प्राथमिक आरोग्य केंद्र १२०, आढळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र १००, उपळे प्राथमिक केंद्र१००, वैराग प्राथमिक आरोग्य केंद्र २०० ,ग्रामीण रुग्णालय बार्शी ११०, ग्रामीण रुग्णालय पांगरी २००, जगदाळे मामा हॉस्पिटल ५०, कॅन्सर हॉस्पिटल ५०, सुविधा हॉस्पिटल ५०, सुश्रुत हॉस्पिटल ५०, भातलवंडे हॉस्पिटल ५०, नॅशनल अर्बन हेल्थ मिशन २००.
पंचायत समिती सभापती अनिल डिसले यांनी वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीसाठी झालेली गर्दी समजल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली परिस्थिती अतिशय बिकट असून बार्शी तालुक्याला जास्तीत जास्त लस मिळावी यासाठी वरिष्ठांकडे सर्व स्तरातून प्रयत्न करत आहे असे सांगितले.