प्रतिनिधी / करमाळा
कोरोना साथीच्या काळात घरात राहिल्यामुळे इनडोअर उपक्रमांना खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे. मोठ्यांना घरून काम करताना आव्हानांचा सामना करावा लागत आहे, तर लहान मुले वेळ घालवण्यासाठी विविध छंद जोपासण्यात गुंतली आहेत. काही मुले विस्तारित सुट्यांचा आनंद घेत आहेत, तर काही जणांचा पुढील इयत्तांचा अभ्यास यापूर्वीच सुरू झाला आहे. देशभरातील बहुतेक शाळांनी ई – लर्निंग कार्यक्रम आणि ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून ऑनलाइन सत्रे घेण्याचे प्रशिक्षण शिक्षकांना दिले जात आहे.
ई-लर्निंगमधील समस्या दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी काही बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
ऑनलाईन शिक्षणात अनेक अडचणी येतात. मोबाईलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवणे एवढे सोपे नाही. तरी देखील करमाळा तालुक्यातील साडे केंद्रातील सर्वच शाळेतील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा दर्जा घसरला जाऊ नये यासाठी चंग बांधला असून दररोज ते अभ्यासाच्या तासिका वेळेवर घेतात. त्यांची ही कामगिरी खरीच कौतुकास्पद असल्याचे मत गटशिक्षणाधिकारी राजाराम भोंग यांनी व्यक्त केले आहे.
साडे केंद्रातील शाळेंचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी हे मत व्यक्त केले. केंद्रप्रमुख श्रीमती मंगल शिंदे म्हणाल्या की, “पूर्वीप्रमाणे शाळा सुरु करण्यास शासनाने अजून परवानगी दिली नाही. अध्यापन कार्यात खंड पडू देणे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हानिकारक आहे. या कठीण उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये शिक्षणात खंड पडू नये यासाठी साडे केंद्रातील, विठ्ठल कुलकर्णी मॅडम, काटकर मॅडम, भोसले मॅडम,नलवडे गुरूजी, सर्व शिक्षक परिश्रम घेत आहेत. “
केंद्रीय मुख्याध्यापक वसंत बदर यांनी सांगितले की, “कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाईन शाळेशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे ऑनलाईन शाळेचे उत्तम नियोजन करणे आवश्यक होते. त्यानुसार प्रथम अध्यापनाचे वेळेचे नियोजन करण्यात आले. दिवसभराच्या कालावधीत सहसा मोबाईल पालकांकडे असतो याचा विचार करून मोबाईल उपलब्ध असेल अशा वेळी मुलांना सकाळी व सायंकाळी तासिका सुरू करण्याची योजना आखली. त्यानुसार प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला यासाठी सर्व शिक्षक वृंद यांचे सहविचार घेण्यात आले.
Previous Articleअशोक लेलँडला मिळाली मोठी ऑर्डर
Next Article वडगाव येथे मटका अड्डय़ावर छापा









