कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आरोग्य विभागाचा उपक्रम, मोफत तपासणी व औषधोपचाराची सोय
प्रतिनिधी/सोलापूर
जेष्ठ नागरिकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून सव्वालाख जेष्ठ नागरिकांना हेल्थ कार्डचे वाटप केले आहे. याव्दारे शहरातील जेष्ठ नागरिकांची मोफत तपासणी व औषधोपचार करत त्यांची काळजी घेतली जात आहे. तसेच या हेल्थ कार्डमुळे नागरिकांच्या आजारपणातील नोंदी ठेवल्या जात असून त्या पुढील उपचारावेळी कामी येत असल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी सांगितले.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील 1 लाख 26 हजार जेष्ठ नागरिकांना हेल्थ कार्डचे वाटप केले आहे. या सव्वालाख जेष्ठ नागरिकांची दररोज 433 टीमव्दारे टेम्परेचर तपासणी, ऑक्सीजनची पातळी तपासली जात आहे. प्रत्येक टीम मध्ये एक आशा आणि एका शिक्षकाचा समावेश आहे. तपासणीदरम्यान यातील एखाद्या जेष्ठ नागरिकाचे तापमान वाढले किंवा ऑक्सीजनची पातळी 95 पेक्षा कमी आढळल्यास संबंधीतांना जवळच्या कोविड हेल्थ सेंटरला पुढील उपचारासाठी पाठवले जाते. परिणामी वेळच्या वेळीच जेष्ठ नागरिकांच्या तपासण्या व उपचार केल्याने कोरोनाचा धोका टाळण्यास मदत होत आहे.
कोरोनाचे संकट टाळण्यासाठी काळजी
जेष्ठ नागरिकांची प्रतिकारशक्ती कमी असते. अशातच त्यांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांना जास्त धोका उदभवू शकतो. त्यामुळे अशा जेष्ठ नागरिकांची वेळीच काळजी घेतल्यास कोरोनाचे संकट आपण टाळू शकतो. त्यामुळे सव्वालाख हेल्थ कार्डचे वाटप करून जेष्ठ नागरिकांची काळजी घेण्याचा प्रयत्न महापालिका आरोग्य विभागाकडून केला जात आहे. -डॉ. शितलकुमार जाधव, आरोग्य अधिकारी, मनपा
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









