तरुण भारत संवाद प्रतिनिधी /सोलापूर
जेलरोड, एमआयडीसी, सदर बाजार, आणि जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार बसंण्णा संत्तू शिंदे ( वय वर्ष 27, रा. न्यू शिवाजीनगर, गोंधळी वस्ती, सोलापूर). यास पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी एमपीडी अंतर्गत स्थानबद्ध केले आहे. शिंदेच्या विरोधात 47 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची नोंद पोलिसात आहे.
शिंदे याला गुन्हेगारी कारवाईपासून परावृत्त करण्यासाठी सन 2010 मध्ये व सन 2012 मध्ये दोन वर्षाकरिता तडीपार, 2016 मध्ये एमपीडी करण्यात आली होती. अलीकडच्या काळात त्याने त्याच्या साथीदारांसह दहशत माजवुन घरफोडी जबरी चोरी दरोडा घालण्याची पूर्वतयारी करणे असे एकूण 9 गुन्हे केले आहेत. सर्व गुन्ह्यात अटक करून गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे. शिंदे यांच्याविरोधात वेळोवेळी कारवाई करूनही त्याच्या गुन्हेगारी वर्तनामध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









