तरुण भारत संवाद प्रतिनिधी / करमाळा
सध्या सुगीचे दिवस असल्याने शेतात ज्वारी काढण्यासाठी गेलेल्या महिलेवर अत्याचार करून दगडाने डोके ठेचून निर्घृण खून करण्यात आला आहे. भाग्यश्री विकास गाडे (वय-२९) असे या खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणाची नोंद करमाळा पोलिसात झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. ही घटना काल, बुधवारी घडली.
करमाळा तालुक्यातील वीट येथील भाग्यश्री विकास गाडे ही महिला घरातील काम उरकून शेतात ज्वारी काढण्यासाठी गेली होती. दुपारच्या सुमारास ती शेतात न दिसल्याने तिचा शोध घेतल्यानंतर शेतातील जवळच्या ओढ्यात विवस्त्र अवस्थेत तिचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याचे आढळून आले. या घटनेनंतर वीट परिसरात एकच खळबळ उडाली असून घबराहट निर्माण झाली आहे. या महिलेच्या मागे पती, दोन मुले, सासरा असा परिवार आहे.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस प्रमुख विशाल हिरे, पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे. तर घटनास्थळी डॉग स्कॉड ही मागवून शोध घेण्यात आला. तसेच या संदर्भात सर्व प्रकारचे धागेदोरे शोधण्याचे काम पोलीस करत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









