प्रतिनिधी / सोलापूर
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळ्ळी येथील एका शेततळ्यात गावातील दोघा सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. अर्जुन हरिदास पौळ (वय 15) आणि त्याचा लहान भाऊ आर्यन हरिदास पौळ (वय 7, दोघे रा. कर्देहळ्ळी) अशी मृत्यू झालेल्या दोघा सख्ख्या भावांची नावे आहेत. अर्जुन हा इयत्ता नववीमध्ये तर आर्यन हा पहिलीत शिक्षण घेत होता.
कुंभारी येथील अमित ढोले यांची कर्देहळ्ळी येथे शेती आहे. या शेतात हरिदास पौळ हे मजुरीचे काम करतात व तिथे शेतातच कुटुंबासह राहतात. सोमवारी सकाळी पौळ व त्यांची पत्नी शेतात काम करण्यासाठी गेले होते. दुपारी दोघे मुले शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. अर्जुन हा पाण्यात उतरल्याचे पाहून आर्यन हा देखील उतरला. आर्यन बुडत असताना त्याला वाचविताना अर्जुन देखील बुडाला. या दोघांना वाचवण्याचा त्यांच्या वडील व चुलत्याने प्रयत्न केला. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. पौळ यांना तीन मुले होती, त्यातील दोघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. उत्तरीय तपासणीसाठी दोघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात आणण्यात आले आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अतुल भोसले, पोलीस उपनिरीक्षक स्वामीराव पाटील हे तातडीने हजर झाले. फौजदार अजय हंचाटे हे अधिक तपास करीत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









