एकाच दिवशी जिल्ह्यात 35 जणांचा मृत्यू
प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहरात रविवारी 33 तर ग्रामीण भागात 1503 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर शहर जिल्ह्यात एकाच दिवशी 35 रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज नवे कोरोनाबाधित 1503 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून एकाच दिवशी 30 रुग्णांचा मृत्यू तर 2066 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 1503 पैकी 1241 पुरुष, 825 स्त्रियांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 2423 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 1 लाख 17 हजार 241 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 14 हजार 568 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 9710 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 8207 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 1503 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 2423 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 1 लाख हजार 250 जण बरे होऊन घरी गेली आहेत.









