पोलिसांचे सकारात्मक कार्य, 30 रिक्षाचालकांचा रिपोर्ट निगेटिव्ह
तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापुरात कोरोनाची वाढती संख्या पाहता शहर पोलीस दलाकडून कोरूना प्रतिबंधक उपायोजना करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस गेले दोन दिवस शहरातील विविध रस्त्यावर उतरून वाहनचालकांचे मार्गदर्शन करीत आहे. दरम्यान विना मास्क तसेच कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. तर, आज, शनिवारी सकाळी शहरातील महावीर चौकात गुन्हे शाखेच्या पथकाने रिक्षाचालकांना थांबवून त्यांची कोरोना टेस्ट घेतली. त्यामध्ये तीस रिक्षाचालकांचा समावेश होता. विशेष म्हणजे एकही रिक्षाचालक कोरोना पॉझिटिव्ह निघाला नाही.
शहर गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय शिरसागर, पोलीस हवालदार नंडगिरी, रावडे, लोखंडे, आटोळे, मुळे, चव्हाण, बर्डे, होटकर, सावंत, अर्जुन, कसगावडे, सुरवसे, कुंभार, देशमुख, पवार, जाधव व नवले यांनी ह्या कोरोना टेस्ट केल्या.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









