प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहारात शनिवारी नव्याने 52 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारा दरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 76 जनांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी शनिवारी दिली.
सोलापूर शहरात शनिवारी 581 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 52 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 529 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 52 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 29 पुरुष तर 23 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8993 झाली आहे.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 85199
-शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 8993
-प्राप्त तपासणी अहवाल : 85199
-प्रलंबित तपासणी अहवाल : 00
-निगेटिव्ह अहवाल : 76206
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 498
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 812
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 7683
Previous Articleअमेरिकेत 50 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
Next Article सातारा : वेग मंदावतोय बाधित अन् मृत्यूचाही









