प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहारात शुक्रवारी नव्याने 42 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. उपचारा दरम्यान दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 79 जनांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी दिली.
सोलापूर शहरात शुक्रवारी 565 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 42 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 523 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 42 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 26 पुरुष तर 16 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8561 झाली आहे.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 81166
-शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 8561
-प्राप्त तपासणी अहवाल : 81166
-प्रलंबित तपासणी अहवाल : 00
-निगेटिव्ह अहवाल : 72605
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 481
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 850
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 7230
Previous Articleयंदा 25 ते 30 % इथेनॉलची निर्मिती करणार : शरद पवार
Next Article ड्रग रॅकेटमध्ये सहभागी असणारी अभिनेत्री फरार









