प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहारात शुक्रवारी नव्याने 34 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला. उपचार घेऊन बरे झाल्याने 32 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी दिली.
सोलापूर शहरात शुक्रवारी 346 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 34 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 312 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 34 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 19 पुरुष तर 15 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 9200 झाली आहे.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 87178
-शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 9200
-प्राप्त तपासणी अहवाल : 87178
-प्रलंबित तपासणी अहवाल : 00
-निगेटिव्ह अहवाल : 77978
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 512
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 728
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 7960
Previous Articleदुष्काळी माणगंगा नदीला पर्यटनाचे स्वरूप
Next Article बेंगळूर: बीबीएमपी निवडणुका पुढील वर्षी होणार ?









