तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
सोमवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत शहरात 33 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर 8 जणांचा मृत्यू झाला. तसेच उपचार घेऊन बरे झाल्याने 55 जनांना घरी सोडण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
सोमवारी 255 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 33 पॉझिटीव्ह तर 192 अहवाल निगेटिव्ह आले. यामध्ये दाराशा हॉस्पिटल, देगांव, जोडभावी यु.पी.एच.सी. हॉस्पिटल, सिव्हील हॉस्पिटल, पाटीलवस्ती, विनायक नगर, महादेव नगर, एम.आय.डी.सी., दाजीपेठ, साई आंगन सोलापूर, भवानी पेठ, विडीघरकुल, आनंदनगर, ब्रम्हनाथ नगर, कुमठा नाका, जुना विडी घरकुल, न्यू बुधवार पेठ, सिध्देश्वर पेठ, गुरुवार पेठ, कौंतम चौक, मोदीखाना, नरसिंग नगर, बॉम्बेपार्क जुळे सोलापूर, भूषणनगर, उत्तरकसबा, न्यु पाच्छा पेठ येथे 33 रुग्ण आढळले आहेत.
तसेच रेल्वेलाईन परिसरातील ७३ वर्षाचा पुरुष, सिध्देश्वर नगर, नई जिंदगी परिसरातील 67 वर्षाचा पुरष, भवानीपेठ, ढोर गल्ली परिसरातील 84 वर्षीय पुरुष, शुक्रवारपेठ , परिसरातील ७७ वर्षीय पुरुष, राजस्वनगर परिसरातील 49 वर्षीय पुरुष, भारतमता नगर, मजरेवाडी ७० वर्षाची महिला, न्यु बुधवार पेठ येथील 79 वर्षाची महिला आणि न्यु पाच्छापेठ येथील ४ ९ वर्षाच्या पुरुष, अशा 8 जणांचा आज मृत्यू झाला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









