एकाच दिवशी जिल्ह्यात 24 जणांचा मृत्यू
प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहरात गुरूवारी 18 तर ग्रामीण भागात 363 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर शहर जिल्ह्यात एकाच दिवशी 24 रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज नवे कोरोनाबाधित 363 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून एकाच दिवशी 22 रुग्णांचा मृत्यू तर 389 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 363 पैकी 205 पुरुष, 158 स्त्रियांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 2820 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 1 लाख 27 हजार 998 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत.
उर्वरित 3 हजार 151 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली. जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 12964 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 12601 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 363 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 2820 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 1 लाख 22 हजार 027 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
सोलापुर शहरात नव्याने 18 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. तर 13 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर उपचार दरम्यान झाल्याने 2 रुग्णाचा मृत्यु झाला असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. सोलापुर शहरात 3529 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 18 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 3511 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 18 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 10 पुरुष तर 18 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 28 हजार 380 झाली आहे.