तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
सोलापूर शहरात आज, मंगळवारी उपचार घेऊन बरे झालेल्या तब्बल 126 रुग्णांना घरी सोडण्यात आले, तर 44 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
आज, 287 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 44 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 243 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 44 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 24 पुरुष तर 20 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5190 झाली आहे.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 36651
-शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 5190
-प्राप्त तपासणी अहवाल : 36406
-प्रलंबित तपासणी अहवाल : 245
-निगेटिव्ह अहवाल : 31216
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 367
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 1445
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 3378
Previous Articleसांगली : कोरोनाबाधितांवर सरसकट मोफत उपचार व्हावेत
Next Article कोल्हापुरात जोरदार पाऊस; झाडांची पडझड









