मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांची माहिती
बरे झाल्याने 10 रुग्णांना सोडले घरी
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहारात रविवारी नव्याने 78 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारादरम्यान तीन रुग्णांचा मृत्यू झाला, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 10 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी रविवारी दिली.
सोलापूर शहरात रविवारी 469 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 78 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 391 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 78 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 51 पुरुष तर 27 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7902 झाली आहे.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 75505
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 7902
प्राप्त तपासणी अहवाल : 75490
प्रलंबित तपासणी अहवाल : 15
निगेटिव्ह अहवाल : 67588
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 457
रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 918
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 6527