मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांची माहितीबरे झाल्याने 41 रुग्णांना सोडले घरी
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहारात रविवारी नव्याने 60 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारा दरम्यान दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 41 जनांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी रविवारी दिली.
सोलापूर शहरात रविवारी 524 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 60 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 464 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 60 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 37 पुरुष तर 23 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7500 झाली आहे.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 72089
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 7500
प्राप्त तपासणी अहवाल : 72089
प्रलंबित तपासणी अहवाल : 00
निगेटिव्ह अहवाल : 64589
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 443
रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 822
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 6235









