एकाच दिवशी जिल्ह्यात २२ जणांचा मृत्यू
प्रतिनिधी/सोलापूर
सोलापूर शहरात आज, मंगळवारी ४१ तर ग्रामीण भागात ३५७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर शहर जिल्ह्यात एकाच दिवशी २२ रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज नव्या ३५७ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून एकाच दिवशी २० रुग्णांचा मृत्यू तर 681 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. ३५७ पैकी २१० पुरुष, १४७ स्त्रियांचा समावेश आहे. तर आतापर्यंत २७७५ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण १ लाख २७ हजार १५० कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित ३ हजार ०८२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली. जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज १२१९३ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील ११८३६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ३५७ पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत २७७५ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण १ लाख २१ हजार २९३ जण बरे होऊन घरी गेली आहेत.
सोलापुर शहरात नव्याने ४१ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. तर ५८ रुग्ण बरे होऊन घरी परतले तर उपचार दरम्यान झाल्याने २ रुग्णाचा मृत्यु झाला असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. सोलापुर शहरात ३९३१ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील ४१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर ३८९० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. ४१ पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये १२ पुरुष तर २९ स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या २८ हजार ३४८ झाली आहे.
Previous Articleआयकर विभागाची वेबसाईट क्रॅश
Next Article दिलासादायक : दिल्लीतील 14 लाख 161 रुग्ण कोविडमुक्त!









