सोलापूर / प्रतिनिधी
महापालिका हद्दीत शुक्रवारी रात्री 12 पर्यंत 30 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्णांची भर पाडली. त्यामुळे महापालिका हद्दीतील रुग्णांची एकूण संख्या 1107 असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी शनिवारी दिली.
शुक्रवारी, 5 जानेवारी रोजी रात्री 12 पर्यंत एकूण 152 अहवालांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 122 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले, तर 30 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये जिल्हा कारागृहातील 17 जणांचा समावेश आहे. पॉझिटीव्ह अहवालामध्ये 17 पुरुष आणि 13 महिलांचा समावेश आहे. आज संगमेश्वर नगर, सोलापूर कारागृह, एकता नगर, निवासी डॉक्टर वसाहत, विनायक नगर, शुक्रवार पेठ, लोधी गल्ली, सिद्धेश्वर हौसिंग सोसायटी, हनुमान नगर, सिद्धेश्वर नगर, नई जिंदगी आणि 70 फूट रोड येथील रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 94 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 446 पॉझिटीव्ह रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. तर 567 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन परत गेले आहेत
Previous Articleदेशात जवळपास 10 हजार नवे कोरोना रुग्ण
Next Article शिवभक्तीच्या ऊर्जेतून कलायोगींच्या पेटिंगचा ‘रिमेक’








