तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहरात 102 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण
सोलापूर शहारात रविवारी रात्री साडेदहा वाजेपर्यंत 102 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. उपचारा दरम्यान 3 जणांचा मृत्यू झाला तर बरे झाल्याने तब्बल 27 जनांना घरी सोडले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी रविवारी दिली.
सोलापुर शहरात रविवारी 588 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 102 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 486 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 102 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 61 पुरुष तर 41 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3804 झाली आहे. तसेच उपचारादरम्यान 3 जणांचा मृत्यू झाला. तर बरे झाल्याने तब्बल 27 जनांना घरी सोडण्यात आले.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 19241
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 3804
प्राप्त तपासणी अहवाल : 19130
प्रलंबित तपासणी अहवाल : 111
निगेटिव्ह अहवाल : 15326
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 325
रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 1377
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 2102
ग्रामीण भागात तब्बल 260 रुग्णांची भर
ग्रामीण भागामध्ये रविवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत तब्बल 260 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 87 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी रविवारी दिली.
जिल्ह्य़ातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी 2 हजार 304 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 260 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर 2 हजार 44 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 260 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 159 पुरुष आणि 101 महिलांचा समावेश आहे. जिह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 823 झाली आहे.
ग्रामीणमधील संख्या
एकूण तपासणी 13 हजार 131
पॉझिटिव्ह रुग्ण 1 हजार 823
प्राप्त तपासणी अहवाल 13019
प्रलंबित तपासणी अहवाल 112
निगेटिव्ह अहवाल 11 हजार 197
एकूण मृतांची संख्या 44
रुग्णालयात दाखल बांधितांची संख्या 1 हजार 178
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले 601









