प्रतिनिधी / सोलापूर
सोलापुर शहारात रविवारी नव्याने 93 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारा दरम्यान 4 रुग्णांचा मृत्यू झाला, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 25 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी रविवारी दिली.
सोलापुर शहरात रविवारी 1490 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 93 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 1397 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 93 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 48 पुरुष तर 45 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5898 झाली आहे.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 48326
-शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 5898
-प्राप्त तपासणी अहवाल : 48201
-प्रलंबित तपासणी अहवाल : 125
-निगेटिव्ह अहवाल : 42303
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 391
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 1003
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 4504
Previous Articleकोल्हापूर : धबधबेवाडीत कोरोनाने एकाचा बळी
Next Article मनसेच्या किनवट शहराध्यक्षाची आत्महत्या









