सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहारात शनिवारी 116 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. तर उपचार घेऊन बरे झाल्याने 79 जनांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी शनिवारी दिली.
सोलापूर शहरात शनिवारी 2939 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 116 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 2823 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 116 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 82 पुरुष तर 34 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5805 झाली आहे.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 46711
-शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 5805
-प्राप्त तपासणी अहवाल : 46711
-प्रलंबित तपासणी अहवाल : 00
-निगेटिव्ह अहवाल : 40906
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 387
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 939
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 4479