तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहारात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत असुन सोमवारी रात्री 9 वाजेपर्यंत तब्बल 126 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. उपचारा दरम्यान 6 जणांचा मृत्यू झाला तर बरे झाल्याने 12 जनांना घरी सोडले असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी दिली.
सोलापूर शहरात सोमवारी 261जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 126 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 135 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 126 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 78 पुरुष तर 48 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2814 झाली आहे. तसेच उपचारादरम्यान 6 जणांचा मृत्यू झाला. तर बरे झाल्याने 12 जनांना घरी सोडण्यात आले.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 13926
सोलापूर शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 2814
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 277
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 1101
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 1436
-प्राप्त तपासणी अहवाल : 13733
-प्रलंबित तपासणी अहवाल : 193
-निगेटिव्ह अहवाल : 10919








