मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांची माहितीबरे झाल्याने 29 रुग्णांना सोडले घरी
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहारात मंगळवारी 8 हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा टप्पा पार झाला. तर आज, नव्याने 53 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारा दरम्यान तीन रुग्णांचा मृत्यू झाला, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 29 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी दिली.
सोलापूर शहरात मंगळवारी 485 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 53 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 432 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 53 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 29 पुरुष तर 24 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 8006 झाली आहे.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 76284
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 8006
प्राप्त तपासणी अहवाल : 76284
प्रलंबित तपासणी अहवाल : 00
निगेटिव्ह अहवाल : 68278
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 463
उपचार घेत असलेले : 954
बरे झालेले : 6589









