बार्शीचे तहसिलदार यांची कारवाई !
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / वैराग
वैराग (ता. बार्शी) येथे सार्वजनिक स्वास्थ धोक्यात आणणाऱ्या व बेजबाबदारपणे वागणाऱ्या ५५ जणांवर बार्शीचे तहसिलदार किरण जमदाडे यांनी कारवाई करीत त्यांच्याकडून साडेपाच हजारांचा दंडवसुल केला.
या दंडात्मक कारवाईत राजकिय पक्षाचे पदाधिकारी अनेक संस्था, सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते आढळल्याने वैरागच्या चौका- चौकात चर्चेचा विषय ठरला आहे. बार्शी तालुक्यात कोरोनाचा संसर्ग संख्या वाढतच आहे. अनेकजण सोशल डिस्टन्स व मास्क न वापरणाऱ्यांची संख्या वाढत होती. याची खबरदारी घेत बुधवारी बेजबाबदरपणाने वागून सार्वजनिक स्वास्थ्य धोक्यात आणणारे व विनामास्क फिरणाऱ्या ५५ नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलीस प्रशासनाच्या मदतीने कारवाई करीत प्रत्येकी शंभर रुपयांप्रमाणे साडेपाच हजारांचा दंड वसूल केला. या कारवाईने मोकाटपणे फिरणाऱ्यांवर वचक बसणार आहे.









